राग दरबारी मराठी पुस्तक | Rag Darbari Marathi Book PDF Download
हिंदी कादंबरीचा इतिहास एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकापासून सुरू होतो. परंतु एका गंभीर व सुस्पष्ट परंपरेची सुरूवात प्रेमचंदांपासून होते. विसाव्या शतकाच्या प्रारंभिक दशकांमध्ये पाश्चात्य जगातील कादंबरी-साहित्य आपल्या विकासाच्या शिखरावर जाऊन पोचले असता हिंदी कादंबरी आपल्या शैशवकालीन बाळबोय वळणातून मुक्त होण्यासाठी धडपड करीत होती ही एक आश्चर्याचीच गोष्ट समजता येईल. प्रेमचंदांच्या कलाकृतींनी थोड्याच वर्षांच्या अवधीत कादंबरी साहित्यात नवीन विक्रम स्थापित केले आणि हिंदी कादंबरीला जागतिक कादंबरीच्या बरोबरीचा दर्जा मिळवून देऊन तिला उत्कृष्ट कादंबरी विश्वाच्या मानचित्रावर स्थानापन्न केले. विसावे शतक हे राजकीय क्रांत्या, सांस्कृतिक संक्रमणे आणि मानव नियती यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे शतक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या प्रगतीने संस्कृती व कलाविद्या यांची निरर्थकता सिध्द करणारे पुरावे पुढे आगले आहेत, एवढेच नव्हे तर कलांना एक बिकट आव्हानही दिले आहे. विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या आव्हानांसमोर कादंबरीही तशीच उभी आहे. कादंबरीतील अतिकल्पना विज्ञानाने साकारही केल्या आहेत. परंतु मानवी आकांक्षांचे अक्षय भांडार अजून भरलेले आहे. तंत्रज्ञान्यसमोर स्वतःता क्षुद्र समजण्याची मानवी भावना आणि तिची संपूर्ण विरूपता यांचे चित्रण कादंबरी करते. आमच्या आजच्या सामाजिक व वैयक्तिक जीवनातील नरकालाड़ी तेवढ्याच तीव्रतेने आधुनिक कादंबरीने आपला विषय बनविले आहे. हिंदी कादंबरी - साहित्याच्या संदर्भात असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही की त्यातही मानवी स्थितीची जशी चित्रणे उपलब्ध आहेत जी कोणत्याही महत्त्वपूर्ण भाषेत उत्कृष्ट कामगिरी समजली जातात. हिंदी कादंबरीचा इतिहास फारसा मोठा नाही हे खरे, तरी पण तिच्या कामगिरीचे टप्पे महत्त्वाचे आहेत.
पुस्तक | राग दरबारी मराठी पीडीएफ / Rag Darbari Marathi PDF
|
लेखक | Shrilal Shukla |
प्रकाशक | National Book Trust, India |
भाषा | Marathi |
कुल पृष्ठ | 151 |
आकार | 11 MB |
फाइल | PDF |
Status | OK |
Download Button