प्राध्यापक आयुषमान मराठी पुस्तक | Pradhyapak Ayushman Marathi Book PDF
Pradhyapak-Ayushman-Marathi-Book-PDF


प्राध्यापक आयुषमान मराठी पुस्तक | Pradhyapak Ayushman Marathi Book PDF Download

मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ यांच्या टीमने औषधी वनस्पतींच्या दैनंदिन उपयोगांबाबत मुलांमध्ये ज्ञानाचा प्रसार करण्याकरिता टिंकल नियतकालिके सोबत मिळून हे कॉमिक तयार केले आहे. आरोग्यवृद्धी आणि रोगप्रतिबंध याकरिता विविध आयुष पद्धतींमध्ये औषधी वनस्पती प्रामुख्याने वापरल्या जातात. या पद्धतींशी निगडीत असलेल्या प्राचीन साहित्यात 8500 पेक्षा जास्त औषधी वनस्पतींचे वर्णन केलेले आहे. आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमियोपॅथी वनस्पतींद्वारे शरीर संतुलित करते, रोगाला प्रतिबंध करते आणि उपचारही करते. या पद्धतीत उल्लेख केलेल्या व आपण दैनंदिन वापरात आणतो अशा कोरफड, तुळस, आवळा, गुळवेल, कडुनिंब, अश्वगंधा आणि ब्राम्ही या औषधी वनस्पतींबाबत लोकांमध्ये जागरुकता वाढवणे आवश्यक आहे. यादृष्टीने तरुण पिढीत ज्ञानाचा प्रसार करण्याकरिता विविध प्रसंग कॉमिक स्वरूपात सादर करण्याचा हा एक अभिनव प्रयोग आहे. प्रतिबंधक आणि उपचारक गुणांमुळे आयुष पद्धती इतर देशांतही स्वीकारली जात आहे. या पद्धती प्रामुख्याने वनस्पतींवर आधारित आहेत आणि दैनदिन आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरगुती उपचार म्हणून उपयोगात आणल्या जातात. आयुष पद्धतींच्या आरोग्यास होणाऱ्या फायद्यांबाबत लोकांमध्ये जागरुकता वाढवली पाहिजे. पारंपरिक पद्धतींनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत मुलांना प्रशिक्षित करणारी ही अभिनव कॉमिक पुस्तिका प्रकाशित करण्यात एनएमपीबी टीम आणि अमर चित्र कथा यांनी दिलेल्या योगदानाची मी प्रशंसा करते. मला विश्वास वाटतो की टिंकल नियतकालिक आपल्या मुलांचे आणि त्यांच्या कुटुबांचे आरोग्य अधिक चांगले घडवण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल. हा प्रयत्न माननीय पंतप्रधान यांच्या स्वस्थ भारत स्वप्नाची पूर्तता करण्यात निश्चितच आपले योगदान देईल.


पुस्तकप्राध्यापक आयुषमान मराठी पीडीएफ / Pradhyapak Ayushman Marathi PDF
लेखकTushar Abhichandani
प्रकाशकMinistry Of Ayush, India
भाषाMarathi
कुल पृष्ठ35
आकार3 MB
फाइलPDF
StatusOK


Download Button