मराठी लघुकथा पुस्तक | Marathi Laghukatha Book PDF Download
कथनप्रियता मानवी मनाची एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे. अनादी कालापासून माणूस गोष्ट ऐकत आला आहे आणि सांगत आला आहे. आपण काय पाहिले, काय अनुभवले आणि आपल्याला काय वाटले ते दुसन्याला सांगावे ही अनिवार इच्छा माणसाला स्वस्थ बसू देत नाही. मानवाबरोबर गोष्टीचा जन्म झाला. गोष्टीने कालाच्या ओघात विविध रूप धारण केली. तिला स्वतंत्र वाङ्मयप्रकार म्हणून प्रतिष्ठा लाभली ती इंग्रजी राजवटीत गोष्ट, स्फुट गोष्ट, संपूर्ण गोष्ट, लघुकथा, नवकथा अशा ठळक टप्यांनी मराठी कथेची वाटचाल झाली आहे. अनेक वृत्त्यंतरे आणि स्थित्यंतर घडून आली आणि आज मराठी कथा श्रीमंत आहे याचा अभिमान वाटतो. इंग्रजी आरंभीच्या काळात गोष्ट मनोरंजनासाठी व उपदेश करण्यासाठी किंवा लोकोक्ती सिद्ध करण्यासाठी अवतरत होती. 'गोष्ट' हे एक वाचकांच्या मनावर एखादा नीतिपर विचार बिंबविण्याचे प्रभावी साधन आहे हे जाणून तिचा उपयोग स्वमत- प्रसारार्थ, ज्ञानप्रसारार्थ किंवा नीतिविचार प्रतिपादनार्थ करण्यात आला. गोष्ट भाषांतरित वा रूपांतरित असली तरी तिचे उद्दिष्ट बदललं नाही. इंग्रजी वाङ्मयाच्या परिशीलनाने गोष्टीच्या घाटात बदल होत चालला तरी या कालखंडातील गोष्ट घटनाप्रधान होती. रहस्यकथेशी नाते सांगणारी एखादी 'नवलकथा' वाचायला मिळे. बहुसंख्य गोष्टी बोधपर असत. त्यांचा तोंडवळा सारखाच असे. हरी नारायण आपटे यांनी आपल्या साप्ताहिक 'करमणुकी 'तून स्फुट गोष्टी लिहिल्या. एका अर्थाने वाचकांना विश्वासात घेऊन चार सुखदुःखाच्या गोष्टी सांगण्याचे कार्य 'करमणुकी ने तर केलेच पण 'पहिलेच भांडण', 'डिसपेशिया', 'काळ तर मोठा कठीण आला', 'दोन चित्रे' इत्यादी गोष्टींमुळे मराठी कथेचा शुभारंभ झाला असे म्हणता येईल. अद्भुतरम्यतेची सृष्टी सोडून कथा वास्तव जगात आली.
पुस्तक | मराठी लघुकथा पीडीएफ / Marathi Laghukatha PDF
|
लेखक | Bhalchandra Fadke |
प्रकाशक | National Book Trust, India |
भाषा | Marathi |
कुल पृष्ठ | 262 |
आकार | 13 MB |
फाइल | PDF |
Status | OK |
Download Button